नगर, (प्रतिनिधी) – नगर शहर विकासासाठी आंतरशहर(इंटरसिटी) रेल्वे सुरू होणे आवश्यक आहे. विविध कामांसाठी प्रवाशांना दररोज नगर ते पुणे आणि पुणे ते अहमदनगर असा प्रवास करावा लागतो. मात्र गर्दी आणि वाहतुकीची साधने नसल्यामुळे नागरिकांना याठिकाणी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे नगर-पुणे-नगर अंतरशहर रेल्वे सुरू करावी, अशी मागणी वसंत लोढा यांनी रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात नगर जिल्हा हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे.
त्यामुळे नगर-पुणे आणि अहमदनगर आंतरशहर रेल्वे शहरातून सुटण्याची वेळ सकाळी ही सकाळी 6.30 आणि संध्याकाळी ७ वाजता करावी. तर अनेकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्याचा प्रश्न सुटणार आहे. वेळेची बचत होईल. सर्वसामान्यांना रेल्वेचा प्रवास करणेही सोयीचे होणार आहे.
खाजगी, महामंडळ,शिवशाही अशा सुमारे 300 सरकारी व निमसरकारी बसेस अहमदनगर ते पुणे असा प्रवास करतात. दररोज इतक्या बसेस धावूनही गर्दीची समस्या रोजच पहायला मिळते.
नगर ते पुणे 120 किमी अंतरासाठी शिवशाही सारख्या खासगी व सरकारी बसचे भाडे न परवडणारे आहे. त्यामुळे पुणे नगर अंतर शहर रेल्वे सुरू झाली. तर लोकांचा प्रवास सुखकर होईल, भाडे वाचेल आणि रेल्वेचा महसूल वाढेल, असे निवेदनात म्हटले आहे.