द्वितीय सत्र परीक्षेसाठी अर्ज भरणे सुरू

पुणे  -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत.

त्यामुळे विद्यापीठाने तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दुसऱ्या सत्राच्या परीक्षेचे नियोजन करत आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरल्याशिवाय परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित करणे शक्‍य होणार नाही.

त्यासाठी विद्यार्थ्यांना 25 जूनपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ती 15 जूनपर्यंत होती, आता 25 जूनपर्यंत मुदत वाढवली आहे.

मात्र, आता अर्ज भरताना तांत्रिक अडचणींना सामोर जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. करोनामुळे अनेक विद्यार्थी सध्या गावाकडेच आहेत. तेथे नेट कॅफे नसल्याने विद्यार्थी मोबाइलवरून परीक्षा अर्ज भरत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.