कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग सुरू करावे…

दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन अध्यक्षांची मागणी

पुणे(प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयातील कामकाज ठप्प आहे. त्यामुळे वकील आणि पक्षकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या रोखण्याच्या दृष्टीने कौटुंबिक न्यायालयात तात्काळ ई-फायलिंग पद्धतीने कामकाज सुरू करावे, अशी मागणी दि पुणे फॅमिली कोर्ट लॉंयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी केली आहे. याबाबत कौटुंबिक न्यायालय प्रबंधकाना निवेदन देण्यात आले आहे.

सध्या करोनाच्या पाशर्वभूमीवर कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश आणि 5 टक्के कर्मचारी वर्ग उपस्थित राहुन कामकाज करत आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने 12 मे रोजी कौटुंबिक न्यायालयाची संपूर्ण इमारत सॅनिटाईज करून घेतली आहे. तसेच 31 मे पूर्वी पुन्हा सॅनिटाईज करणार आहेत. तसेच इमारतीची साफसफाई देखील करण्यात येणार आहे. तसेच न्यायालयात येणाऱ्या लोकांचे टेम्परेचर मोजण्यासाठीचे 5 ते 6 मशीन उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच येणाऱ्या लोकांच्या टेम्परेचरची चाचणी करता येईल. तसेच कोर्ट सर्वांसाठी सुरू झाल्यावर न्यायालयाच्या प्रवेशव्दारावर सॅनिटाईझेशन, हात धुण्याकरीता बेसिन आणि लिक्विड सोप ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

ई-फायलिंग सुरू करण्याकरिता देखील प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्याबाबत लवकरात लवकर कमिटी प्रयत्न करणार आहे. सर्व प्रकारची खबरदारी घेऊन, वकिलांच्या व पक्षकारांच्या आरोग्याची काळजी घेऊन, त्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामुळ ई-फायलिंगला परवानगी द्यावी, अशी मागणी अॅड. चांदणे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.