उपनगरातील स्थिती; रुग्णांना सेवा दिल्याचा केवळ दिखावा
वानवडी – करोना विषाणूच्या महामारीत अन्य आजाराच्या रुग्णांना चांगली सेवा मिळणे कठीण झाले आहे. परंतु, उपनगरात कंम्पाउंडरच्या जबाबदारीवरच अनेक दवाखाने सुरू असतात. यातून अमूक-तमूक डॉक्टरांचा दवाखाना सुरू असतो, असा केवळ दिखावा केला जात आहे. अशा “फसव्या’ दवाखान्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
वानवडीत छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल व कै. नामदेव शिवरकर दवाखाना व प्रसूतीगृह असे दोन महापालिकेचे दवाखाने येथे आहेत. रुग्णालयातील लसीकरण व गर्भवती महिलांवरील उपचार, ताप, सर्दी, खोकला तसेच ड्रेसिंग अशा तत्सम आजारासाठी रुग्णांना खासगी दवाखाना परवडत नाही. परंतु, शाहू दवाखाना दोन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.