बारामती – प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक (थम) हजेरी सुरू करा, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुका गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
विद्यार्थी हा शाळांमध्ये फक्त हजेरीपटावर आहे. शिक्षण मात्र, बारामती शहर परिसरात असणाऱ्या खासगी ऍकॅडमीत लाखो रूपये फी भरून घेत आहे. हा सावळा गोंधळ सुरू आहे. शाळेत विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थित असणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी हजर नसतात. या गोष्टीला कोण पाठीशी घालत आहे, याची चौकशी करण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकल्स कशी घेतली जातात. विद्यार्थी हा फक्त हजेरी पटावर उपस्थित आहे. परीक्षा देण्यासाठी शाळांमध्ये येतोय. उर्त्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जाण्यासाठी शाळेत येताना दिसत आहे. या संदर्भात गट शिक्षण अधिकारी यांनी चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आहे, या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष तालुकाध्यक्ष ऍड. अमोल गुलाबराव सातकर, विठ्ठल देवकाते, डॉ. नवनाथ मलगुंडे, निखील दांगडे, किशोर सातकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.