बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर ‘या’ स्टार्सची जोडी कधी दिसलीच नाही!

चित्रपटांमध्ये अनेकदा मल्टीस्टारर कास्ट पाहिले जाते ज्यात बरेच तारे एकत्र काम करताना दिसतात. त्याचबरोबर काही सेलिब्रिटींमध्ये अशी केमिस्ट्री आहे की ती बर्‍याच चित्रपटांमध्ये वारंवार कास्ट केली जाते. तरीही बॉलिवूडमधील असे काही स्टार्स आहेत ज्यांनी एकच स्क्रीन कधी शेअर केली नाही. या स्टार्सचा दमदार अभिनय पाहून असे वाटणे साहजिक आहे की जर हे तारे एकत्र आले असते तर पडदा दणाणून सोडला असता. चला तर, पाहुयात कोणकोणत्या स्टार्सची जोडी पडद्यावर कधीच एकत्र दिसली नाही ते. 

* शाहरुख खान-आमिर खान    

बॉलिवूडचा किंग खान आणि मिस्टर परफेक्टिस्ट आमिर खान आजपर्यंत कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसले नाहीत. एकीकडे, जिथे सलमान खानने दोन्ही स्टार्सबरोबर काम केले आहे, तिथे शाहरुख आणि आमिर कधीही कोणत्याही चित्रपटाचा भाग झाले नाहीत. मात्र शाहरुख आणि आमिर अनेक वेळा एकत्रित ऑफस्क्रीन दिसले.  कधी त्यांच्या मतभेदाच्या बातम्या आल्या तर कधी मैत्रीही झाली पण आजपर्यंत प्रेक्षकांना हे दोन सुपरस्टार्स एका फ्रेममध्ये दिसू शकले नाहीत.

* कंगना रनौत आणि रणबीर कपूर

कंगना अनेकदा बॉलिवूडमध्ये स्त्री केंद्रित चित्रपट करताना दिसली. जरी तिने  पडद्यावर बर्‍याच हिरोंसोबत रोमान्स केला तरी रणबीर कपूरबरोबर तिने कधी काम केले नाही. इतकेच नाही तर कंगना अनेक वेळा रणबीर कपूरला लक्ष्य करतानाही दिसली आहे. त्यामुळे यापुढे कंगना आणि रणबीर कधी चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता कमीच आहे.

* सलमान आणि दीपिका पादुकोण

दीपिकाने आपल्या करिअरची सुरूवात ओम शांती ओम चित्रपटाद्वारे शाहरुख खानबरोबर केली होती. या व्यतिरिक्त ती इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांसोबत दिसली आहे. तथापि, सलमान खान आणि दीपिकाची आजपर्यंत पडद्यावर जोडी नव्हती. जेव्हा जेव्हा दीपिका सलमान सोबत रिएलिटी शोमध्ये दिसली तेव्हा त्यांची केमिस्ट्री लोकांना चांगलीच आवडली होती. ही जोडी पडद्यावर पाहून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल.

* गोविंदा आणि काजोल

गोविंदाने पडद्यावर बर्‍याच नायिकांसोबत रोमान्स केला, पण काजोलबरोबर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. असं म्हटलं जात आहे की हे दोघे एकत्र एक चित्रपट करणार होते, पण काही कारणास्तव शूटिंग होऊ शकले नाही आणि दोघांनीही जोडी बनता बनता राहिली. तथापि या दोघांनी बरेच ऑफस्क्रीन फोटोशूट केले होते. त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

 

* अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी

अक्षय आणि राणी 90 च्या दशकापासून इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि चित्रपट करत आहेत. मात्र अक्षय आणि राणीची जोडी आजपर्यंत पडद्यावर दिसू शकली नाही हे एक मोठे आश्चर्य आहे. राणीने गोविंदा, शाहरुख, सलमान अशा सर्व मोठ्या स्टार्सबरोबर काम केले पण अक्षय सोबत ती कधीही कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. या दोघांची मैत्री बर्‍यापैकी चांगली असली तरी भविष्यात दोघांनाही एका चित्रपटात एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.