बॉलीवूडमधील कलाकारांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या चाहत्यांची संख्या कमी नाही. या प्रेमामुळं म्हणजेच त्यांना असणाऱ्या स्टारडममुळं अनेकदा हे कलाकार भारावूनही जातात. कित्येकदा त्यांना यामुळं वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर यामुळं मर्यादाही घालाव्या लागतात. त्याचबरोबर सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांना अनेक व्यवधानांचं पालन करावं लागतं.
त्यामुळंच की काय हृतिक रोशनसारखा कलाकार या स्टारडमचं मूल्य काय असं विचारलं असता त्याचं उत्तर सामाजिक जबाबदारी असं देतो. अलीकडेच बॉलीवूडच्या या मॅचोमॅनला याविषयी विचारलं असता त्यानं हे उत्तर दिलं आहे. हृतिकला चित्रपटसृष्टीत येऊन आता दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या हृतिकच्या “वॉर’ या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
या यशानंतरच हृतिकला हा प्रश्न विचारला असता त्यानं स्टारडमचा अर्थ प्रत्येकानं आपापली वैयक्तिक जबाबदारी तसेच सामाजिक जबाबदारी असा घ्यायला हवा असं म्हटलं आहे.