चॅलेंजर टेनिस स्पर्धेत स्टार खेळाडूंचा सहभाग

पुणे: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्यातर्फे आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित केलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत भारताचे स्टार टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्‍वरन, सुमित नागल, रामकुमार रामनाथन व साकेत मायनेनी यांचा खेळ पाहण्याची संधी टेनिस शौकिनांना मिळणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग सहाव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देशात होणारी ही एकमेव चॅलेंजर स्पर्धा असल्याने खेळाडूंसाठी विशेष महत्त्वाची आहे. जवळपास 20 देशातील स्पर्धकांचा सहभाग हे या या स्पर्धेसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन हे अशा पद्धतीने करता येते की विजेत्याला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत पोहचू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. या स्पर्धेसाठी शीतल अय्यर या एटीपी रेफ्री असतील.

स्पर्धेचा अंतिम सामना 17 नोव्हेंबरला होणार आहे. केपीआयटी पुरुष चॅलेंजर विजेत्यास 7200 डॉलर्स (5,10,000 रुपये) आणि 80 एटीपी गुण तर, उपविजेत्यास 4240 डॉलर्स (3,00,000 रुपये) व 48 एटीपी गुण मिळतील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)