मुंबई – प्रायोजक व बीसीसीआय यांच्यातील वाद नवे नाहीत पण आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. संघाचे प्रायोजक असलेल्या बायजूने 140 तर, स्टार क्रीडा वाहिनीने बीसीसीआयकडे 130 कोटी रुपयांची ससवलत मागितली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत यावर चर्चा झाली मात्र, अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
Virat Kohli | आर अश्विनने विराटबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरली; ट्विट झाले तुफान व्हायरल!
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या जर्सीवर प्रायोजक बायजू नाव आहे. तेच मुख्य प्रायोजकही आहेत. करारानुसार त्यांनी बीसीसीआयकडे 140 कोटी रुपयांची बॅंक गॅरेंटीही मागितली आहे. तसेच मुख्य प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्टस नेटवर्कनेही बीसीसीआयला कडे 130 कोटी रुपयांची सवलत मागितली आहे.
विराटच्या धडाकेबाज खेळीने मोडला सचिनचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड; बनला जगातील अव्वल!
तसेच बायजूने भारतीय क्रिकेट संघाची जर्सी प्रायोजकता करारातून माघार घेण्याचेही संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. अर्थात बैठकीत झालेल्या चर्चेनंतर अद्याप या प्रायोजकांशी बीसीसीआयने कोणताही संवाद साधलेला नाही. यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत बायजूने हा करार मोडू नये यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. आता बायजू त्याला काय प्रतिसाद देतात यावर लक्ष केंद्रित आहे.
त्यांच्यासह स्टारशी असलेला करारही संकटात आला आहे. आता बीसीसीआय केंद्र सरकार व अर्थमंत्रालयाशी संवाद साढून काय तोडगा काढते याकडे लक्ष लागले आहे. मात्र, गेल्या दोन मौसमांपासून बीसीसीआयने अनेक प्रायोजक गमावले असल्याने आता ते सुवर्णमध्य काढणार का हाच प्रश्न निर्माण झाला आहे.