लोणंद – उभे रिंगणाचा सोहळा… साठवूनी पाहती डोळा… लीला करी अश्व भोळा…अश्व दौडीने संपन्न झाला चांदोबाचा पहिला रिंगण सोहळा. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण आज फलटण तालुक्यातील तरडगावजवळील चांदोबाचा लिंब येथे पार पडले.
यावेळी परिसरात सुरू असलेला नामघोष आणि महिला- पुरुषांनीही बेभान होऊन घातलेल्या फुगड्या अणि फेर धरून येथे स्वर्ग सुखाचा सोहळाच सुरू केला. रिंगणाच्या जागेत सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. रिंगण सोहळा आटपून विविध खेळ खेळून पुन्हा अलोट उत्साहाने न्हालेले वारकरी तरडगावच्या दिशेने मुक्कामासाठी निघाले.