स्थायी समिती सभेच्या बैठक व्यवस्थेत बदल

पिंपरी – पिपरी – चिंचवड महापालिकेचा ब गटात समावेश झाला आहे. त्यामुळे काही पदे नव्याने निर्माण झाली आहेत. तर, काही पदे रद्द करण्यात आली आहेत. ही बाब लक्षात घेऊन स्थायी समिती सभेकरिता नव्याने बैठक व्यवस्था पुनर्रचना करण्यात आली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेसाठी 13 नोव्हेंबर 2014 रोजीच्या आदेशानुसार, महापालिकेतील गट “अ’ मधील विभागप्रमुखांची बैठकव्यवस्था निर्धारित करण्यात आली आहे. त्यानंतर, महापालिकेचा “ब’ गटात समावेश झाला आहे. तसेच आस्थापनेवरील काही पदे “अ’ गटात समाविष्ट झाली आहेत. काही पदे नव्याने निर्माण झाली आहेत. तर, काही पदे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे स्थायी समिती सभेकरिता नव्याने बैठक व्यवस्था करणे आवश्‍यक होती. महापालिका स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी यांनीही 2 मे 2019 रोजी स्थायी समिती बैठक व्यवस्था सुधारीत करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील संविधानिक पदांच्या क्रमवारीप्रमाणे बैठक व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात आली आहे.

त्यानुसार, महापालिका स्थायी समिती सभागृहात उजव्या बाजूस नगरसचिव यांची बैठक व्यवस्था असणार आहे. तर, डाव्या बाजूस महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त एक आणि दोन, शहर अभियंता, उपसंचालक नगररचना, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखा अधिकारी, सहायक आयुक्‍त – “फ’ क्षेत्रीय कार्यालय, सहायक आयुक्‍त – कर आकारणी व करसंकलन विभाग, निवडणूक, सहायक आयुक्‍त- मध्यवर्ती भांडार, भूमी व जिंदगी, सहायक आयुक्‍त – झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, कामगार कल्याण विभाग, कायदा विभाग, सहायक आयुक्त – “ग’ क्षेत्रीय कार्यालय, नागरवस्ती व विकास योजना विभाग, सहायक आयुक्‍त – “ड’ क्षेत्रीय कार्यालय, आकाशचिन्ह व परवाना विभाग, सहायक आयुक्‍त – “क’ क्षेत्रीय कार्यालय, माहिती व जनसंपर्क, सहायक आयुक्‍त – “ब’ क्षेत्रीय कार्यालय, एल. बी. टी., सहायक आयुक्‍त – “अ’ क्षेत्रीय कार्यालय, सुरक्षा विभाग, आपत्ती व्यवस्थापन, सहायक आयुक्‍त – “ह’ क्षेत्रीय कार्यालय, क्रीडा विभाग, सहायक आयुक्त – “इ’ क्षेत्रीय कार्यालय, सह शहर अभियंता – विद्युत/यांत्रिकी, सह शहर अभियंता – स्थापत्य, सह शहर अभियंता – पाणीपुरवठा व जलनि:सारण, सह शहर अभियंता – स्थापत्य, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मुख्य उद्यान अधिक्षक – उद्यान व वृक्षसंवर्धन, आरोग्य कार्यकारी अधिकारी, प्रशासन अधिकारी – शिक्षण मंडळ आणि त्यानंतर अधिष्ठाता – यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, पदव्युत्तर पदवी संस्था अशी बैठक व्यवस्था असणार आहे. तसेच इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी मागील रांगेत बसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)