खेड तालुका आढळरावांच्या पाठीशी उभा

अतुल देशमुख यांचा विश्‍वास : पाईट येथे प्रचाराची नियोजन बैठक

पाईट – राष्ट्रवादीला मतदान करणे म्हणजे खेड तालुक्‍याचे नुकसान करण्यासारखे आहे. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात खेड तालुका अतिशय शांत आहे. गावागावांतील भांडणे संपली आहेत, खोट्या खटल्यांचे वाद संपले आहेत. याच सरकारच्या काळात तालुक्‍याला सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्यामुळे पश्‍चिम पट्ट्यासह संपूर्ण खेड तालुका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीशी उभा राहिल, असा विश्‍वास भाजपचे खेड तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी व्यक्त केला.

पाईट (ता. खेड) येथे शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांती महायुतीचे उमेदवार तथा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 17) पार पडली, त्यावेळी देशमुख बोलत होते. या बैठकीला अपूर्व आढळराव पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, जयसिंग दरेकर, शिवाकाली खेगले, महादू डांगले, महेश शेटे, शंकर खेगले, दत्ता रौंधळ, नाना रौंधळ, अनुपमा गुरव, बाळासाहेब आहेरकर, नारायणग आहेरकर, अनथा करंडे, सागर राळे, सुनिल देवकर, भिमराव नवले, शंकर आवारी, पप्पूशेठ राळे, नवनाथ दरेकर, वंदना डांगले, रोहिदास जाधव, कैलास सोनवणे, अनथा ओझरकर, अंकुश तांबे, निवृत्ती चोरघे, शंकर डांगले यांच्यासह परिसरातील गावचे सरपंच, उपसपंच ग्रामपंचायत सदस्य व सेना-भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अतुल देशमुख म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामुळे पश्‍चिम पट्ट्याला सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची जनता खासदार आढळराव पाटील यांनाच मतदान करेल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. यावेळी अपूर्व आढळराव पाटील, शरद बुट्टे पाटील व अन्य पदाधिकाऱ्याची भाषणे झाली.

शिवसेना-भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्णय घेतला असून पाईट-पिंपरी बद्रुक जिल्हा परिषद गटात खासदार आढळराव पाटील यांना जास्तीतजास्त मतदान करण्यासाठी आम्ही एकजुटीने कामाला लागलो आहेत, त्यामुळे आढळराव पाटील यांचा विजय निश्‍चित आहे.
– शरद बुट्टे पाटील, सदस्य, जिल्हा परिषद

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.