नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी स्टॅंड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात खटला दाखल करण्यात येणार असल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
स्टॅंड अप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिले आहेत.
रिपलब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर वादग्रस्त ट्विट करत कुणाल कामरा याने न्या. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यासंदर्भात काही ट्विट्स देखील त्याने केले होते.
यासंदर्भात काही वकिलांनी ऍटर्नी जनरल यांच्याकडे तक्रार केली. यानंतर ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी कुणाल कामराविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.