केपटाउन: वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि कगिसो रबाडा हे विश्वचषकामधील इंग्लंडविरुद्धच्या लढतीपूर्वी तंदुरुस्त होतील, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी व्यक्त केला. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला 30 मे रोजी सुरुवात होत आहे. यात दक्षिण आफ्रिकेची सलामीची लढत याच दिवशी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दुखापतीमुळे डेल स्टेन आणि रबाडा यांना आयपीएल स्पर्धाही अर्ध्यातून सोडावी लागली होती. रबाडाने तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 25 विकेट घेतल्या होत्या.