संगमनेर, ( प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील युवकांच्या रोजगार स्वयंरोजगारासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणारे आमदार सत्यजित तांबे यांची स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे मान्यता प्राप्त राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संस्थेने एक महाराष्ट्र एक ध्येय या उपक्रमाची घोषणा केली असून स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे अध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड झाली आहे.
आ. तांबे म्हणाले की, स्टेअर्स फाउंडेशनच्या सहकार्याने एक महाराष्ट्र एक ध्येय हा उपक्रम जास्तीत-जास्त तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण राबवणार आहोत.
क्रीडापटूंच्या पुढच्या पिढीचे पालक पोषण करण्यासाठी तळागाळात क्रीडा विकास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध क्रीडा संस्कृतीमुळे हा उपक्रम संभाव्यपणे जीवन बदलू शकतो आणि खेळात योगदान देऊ शकतो.