स्टार ऍकॅडमी आणि ओम ऍकॅडमीची आगेकूच

स्टेडियम क्रिकेट कप अजिंक्‍यपद स्पर्धा 2019

पुणे – स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्‍यपद स्पर्धेच्या 14 वर्षाखालील गटात स्टार क्रिकेट ऍकॅडमी आणि ओम क्रिकेट ऍकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.

स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 14 वर्षाखालील गटाच्या सामन्यात राज मिश्रा याने केलेल्या 80 धावांच्या जोरावर स्टार क्रिकेट ऍकॅडमीने ओम क्रिकेट ऍकॅडमीवर 5 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्टार क्रिकेट ऍकॅडमीने 25 षटकात 9 गडी गमावून 133 धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये राज मिश्राने 65 चेंडूत 13 चौकारांसह 80 धावांचे योगदान दिले. ओम संघाच्या स्टिफन नंदीगम 4 गडी तर, ओम साळुंखे 2 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात खेळताना ओम क्रिकेट ऍकॅडमीचा डाव 25 षटकात 128 धावांवर संपला. त्यांचे 9 गडी बाद झाले. ओम संघाने चांगल्या सुरूवातीनंतर महत्वाच्या क्षणी फलंदाज गमावल्याने त्यांना विजयासाठी 5 धावा कमी पडल्या. ओम साळुंखे (28 धावा), कविश बदेरा (29) व अरमान शेख (17) या ओम संघाच्या खेळाडूंनी कडवी झुंझ दिली. स्टार संघाच्या श्री जाधव (3-26), नील चव्हाण (2-26) आणि आर्य पाटील (2-29) यांनी चमकदार गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या सामन्यात, पराभवातून धडा घेत ओम क्रिकेट ऍकॅडमी पुना पॅंथर्स संघाचा 61 धावांनी विजय मिळवला. ओम साळुंखे याने 52 चेंडूत 74 धावा फटकावत प्रथम फलंदाजी करणार्या ओम संघाला 25 षटकात 165 धावांची मजल मारून दिली. ओम साळुंखे याने अर्थव ढोरे (15 धावा) याच्यासह 71 धावांची सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
या आव्हानाचा पाठलाग करताना पुना पॅंथर्स संघाने सावध सुरूवात केली.

भार्गव पाठक (16 धावा) आणि अभिषेक राठोड (12 धावा) यांनी धावसंख्येचा पाठलाग करण्याचा चांगला प्रयत्न सुरू केला. पण, मोठी खेळी करण्यात त्यांना अपयश आले. पुना संघाचा डाव 25 षटकात 104 धावांवर आटोपला. ओम संघाच्या आशिष खोकर याने 22 धावात 4 गडी बाद केले. तर, अर्थव ढोरे (2-27), ओम साळुंखे (2-20) आणि संघामध्ये असलेली एकमेव मुलगी खेळाडू, मोना नमाडे (2-23) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.