स्टेडियम क्रिकेटकप अजिंक्यपद स्पर्धा 2019
पुणे – रमणबाग इलेव्हन संघाने सलग दोन विजय मिळवून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वसंतदादा सेवा संस्था आणि स्टेडियम क्रिकेट क्लब आयोजित स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्यपद स्पर्धेच्या 16 वर्षाखालील गटात आगेकूच केली.
स.प. महाविद्यालय मैदानावर झालेल्या 16 वर्षाखालील गटाच्या सामन्यात समर्थ काळभोर याच्या कामगिरीच्या जोरावर रमणबाग संघाने स्टेडियम क्रिकेट क्लबचा 9 धावांनी पराभव केला. रमणबाग संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 26 षटकात 7 गडी गमावून 140 धावा केल्या. यामध्ये समर्थ काळभोर याने 38 चेंडूत 5 चौकारासह 46 धावांची खेळी केली. साहील अभंग (नाबाद 26) आणि स्वप्निल जयभाय (20 धावा) या दोघांनीही संघाच्या धावफलकामध्ये हातभार लावला. स्टेडियमच्या राजेश गरूवा याने (3-14) चमकदार गोलंदाजी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना स्टेडियम क्रिकेट क्लबने सावध सुरूवात केली होती. पण, डावाच्या मध्यावर त्यांची घसरगुंडी झाल्याने त्यांचा डाव 25.3 षटकात 131 धावांवर संपुष्टात आला. स्टेडियमच्या स्मित बोरा (25 धावा) अमेय टांकसाळे (14) आणि राजेश गरूवा (14धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. साहील अभंग (2-31) आणि समर्थ काळभोर (2-27) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाची जबाबदारी उचलली.
अतिशय कमी धावसंख्येच्या झालेल्या सामन्यात रमणबाग संघाने क्लब ऑफ क्लब संघाचा एकतर्फी पराभव केला. दोन्ही डाव मिळून केवळ 99 धावा या सामन्यामध्ये झाल्या. क्लब ऑफ क्लब संघाचा डाव रमणबाग संघाच्या मानस कोंढरे याच्या गोलंदाजीसमोर 49 धावांवर कोलमडला.मानस याने भेदक गोलंदाजी करून 25 धावात 6 गडी बाद केले.रमणबागच्या साहील अभंग याने (2-12) मानसला योग्य साथ दिली.ओम भेटावडेकर (नाबाद 18 धावा)व मानस कोंढरे (नाबाद 19 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोराव ररमणबाग इलेव्हनने आवश्यक धावा 4 षटकात पूर्ण केल्या.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : गट साखळी फेरी :
16 वर्षाखालील गट :
रमणबाग इलेव्हनः 26 षटकात 7 बाद 140 धावा (समर्थ काळभोर 46, साहील अभंग नाबाद 26, स्वप्निल जयभाय 20, राजेश गरूवा 3-14) वि.वि.स्टेडियम क्रिकेट क्लब ः 25.3 षटकात सर्व बाद 131 धावा (स्मित बोरा 25, अमेय टांकसाळे 14, राजेश गरूवा 14, साहील अभंग 2-31, समर्थ काळभोर 2-27) क्लब ऑफ क्लब : 12 षटकात सर्व बाद 49 धावा (ऋषीकेश चौधरी 17, दर्शन गुजराथी 12, मानस कोंढरे 6-25, साहील अभंग 2-12) पराभूत वि. रमणबाग इलेव्हनः 4 षटकात बिनबाद 50 धावा (ओम भेटावडेकर नाबाद 18, मानस कोंढर ेनाबाद 19); सामनावीरःमानस कोंढरे;