पुणे – करोनामुळे बंद असणारी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची “सुपरफास्ट’ सेवा पुन्हा एकदा मार्गावर येत आहे.
मागील आठवड्यापासून आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. या कालावधीत लाखो नागरिकांनी प्रवास केला असून, याद्वारे एसटीला सुमारे 90 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
एसटीची तालुका, जिल्हा आणि आंतरजिल्हा सेवा अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातूनदेखील गाड्या धावत आहे.
एसटीच्या पुणे विभागामध्ये 21 ते 28 ऑगस्ट या कालावधीत 213 मार्गांवर गाड्या येत असून, यांतर्गत दररोज 850 फेऱ्या होत आहेत. या कालावधीत एसटी सुमारे 4 लाख 94 हजार किलोमीटर धावली. यातून 1 लाख 21 हजार 918 जणांनी प्रवास केल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.