भीमाशंकर मंदिरापर्यंत एसटी जाणार

20 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार

पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भीमाशंकर मंदिरापर्यंत बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोडण्यात येणाऱ्या 20 मिडीबसेस पुढील आठवड्याच्या अखेरीस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली.

बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला भाविकांची कायम गर्दी असते. त्यामुळे भीमाशंकरसाठी मिडी बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. अखेरीस या मागणीचा विचार करुन महामंडळाने मिडी बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस लवकरच मार्गावर सोडण्यात येतील, असे महामंडळाने नमूद केले. महामंडळाकडून सोडण्यात येणाऱ्या बसेसवर मंदिराचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. 32 आसनांच्या या बसेसमध्ये प्रवाशांसाठी टीव्हीची सोय केली आहे. याद्वारे प्रवाशांना मंदिरातील अभिषेक आणि आरती पाहता येणार आहे. भीमाशंकर पार्किंग ते भीमाशंकर मंदिर हे अंतर सुमारे 7 किलोमीटरचे असून प्रवाशांची सोय व्हावी, याकरिता मिडीबसेस या मार्गावर धावतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.