ST Bus Strike । ऐन गणेशोत्सवादरम्यान पुन्हा एकदा राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. ST Bus Strike ।
प्रवाशांची गैरसोय
एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी काल राज्यभरात तीव्र निदर्शन करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यानंतर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात हा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यात शाळकरी मुलांचे सुद्धा मोठे हाल झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. खाजगीकरण बंद करावे, सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा, इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा, जुन्या झालेल्या बसचा वापर न करता नवीन बस खरेदी करा.
वेळापत्रकातील त्रुटी दूर करा, विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचा मोफत पास द्या, सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी, या सर्व मागण्यांसाठी हे आंदोलन केलेजात आहे. यावर आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ST Bus Strike ।
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सातारा, नागपूर आणि अकोला येथील आगारातून एकही बाहेर पडली नाही. स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व गाड्या बंद असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवादरम्यान गावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
दीपिकाने फोटोशूटमध्ये बेबी बंप केला,’फ्लॉन्ट’; फेक बेबी बंप म्हणत ट्रोल करणाऱ्यांना दिल ‘उत्तर’