शिरूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस.टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे, महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खाजगीकरण, सुधारीत जाचक कार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप दि. ०३ रोजी पुकारला आहे. शिरूर बस स्थानकातील तेरा कामगार संघटनांनी राज्यभरात पुकारलेल्या संपात सहभागी होऊन शिरूर एसटी बसस्थानकात धरणे आंदोलन केले आहे. तर राज्य शासनाने याबाबत दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे एसटी कामगार संतप्त झालेआहे.
या धरणे आंदोलन व काम बंद आंदोलनात अध्यक्ष – सुनिल जगदाळे ,सुनिल जगताप ,कैलास सुर्यवंशी,संभाजी थोरात,सुभाष ढावरे,सुनिल पवार व मोठया प्रमाणावर पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळपासून शिरूर एसटी बस स्थानकातून एकही एसटी बस बाहेर न गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे व प्रवाशांचे हाल झाले आहे. एसटी बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. एसटी सुरू होईल का नाही मात्र याबाबत कुठलीही माहिती प्रवाशांना नसल्याने प्रवासी द्विदा मनस्थितीत होते.
शिरूर एसटी बस स्थानकातून रोज नऊशे ते हजार एसटी बस यांची ये -जा असते .त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक एसटी बस ने प्रवास करतात. एसटी बस बंद असल्याने व कामगारांनी बंद पुकारल्याने मोठ्या प्रमाणात बस स्थानकात प्रवाशांचे गर्दी झाली प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले. दि. ०३ रोजी सकाळपासून शिरूर बस स्थानकातील १३ कामगार संघटनांनी या संपात सहभागी होऊन काम बंद आंदोलन सुरू केले. तसेच घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन पुकारले आहे.