सातारा: बस दरीत कोसळून ३३ प्रवाशांचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र
सातारा: बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३३ कर्मचाऱ्यांचा  महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून अपघाती मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. सकाळी १० वाजता ही दुर्घटना घडल्याचे वृत्त असून प्रकाश सावंत-देसाई या कर्मचाऱ्याने बस मधून कसेबसे बाहेर पडत मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधल्याने ही दुर्घटना समोर आली.
दरम्यान बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ३४ कर्मचारी सहलीनिमित्त विद्यापीठाच्या मिनी बसने निघाले होते, मात्र पोलादपूर पासून १५ किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळल्याने ३३ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.    
राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत ट्विट करत परिसरातील अधिकाऱ्यांना दुर्घटनाग्रस्तांना व त्यांच्या परिवारांना मदत करण्यासाठी तातडीने घटनास्थळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.  

काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त करत रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना घटनास्थळी उपस्थित राहून मदत करण्याचे आवाहन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/RahulGandhi/status/1023142423445364737

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)