जालना : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशीच एक भीषण अपघाताची घटना जालन्यामध्ये घडली आहे. एसटी बस आणि भरधाव टेम्पो ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. टेम्पोने पुढील एसटीच्या पुढच्या बाजूस धडक दिल्याने एसटी महामंडळाच्या बसचा समोरील भागाचा अक्षरश: चेंदामेदा झाला आहे.
Congress News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार फेरबदल; नव्या चेहऱ्यांना मिळणार मोठी जबादारी
कसा घडला अपघात?
अपघातग्रस्त बस छत्रपती संभाजीनगरहून माहुरगडकडे येताना या बसला एका भरधाव टेम्पोने समोरून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात 2 ते 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तसेच टेम्पो चालक मद्य पिऊन वाहन चालवित असल्याचे समोर आले आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.