भोर – महुडे (ता.भोर, जि. पुणे) हद्दीत सोमवारी (ता.३०) महुडेहून भोरकडे जाणाऱ्या एसटी बसचा (एम. एच. ०६-एस. ८२८९) महुडे बुद्रुक येथील अंबाबाईच्या उतारावर साईड पट्टी सोडून बाजूच्या जागेत टायर रुतल्याने अपघात झाला आहे. बस चिखलात रुतल्याने मोठा अनर्थ टळला मात्र खड्ड्यात जोरदार आपटल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात ४२ प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाले आहे. ३९ रुग्णांवर भोर उपजिल्हा रुग्णालयात तर तीन रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळी भोरहून दहा वाजता सुटलेली भोर-महुडे बस महुडेहून भोरकडे परतत असताना हा अपघात झाला. सोमवार असल्याने बस पुर्ण भरलेली होती. बसमथ्ये ४२ हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. जखमी ३९ जणांपैकी १४ जणांना रुग्णालयात भरती करुन घेतले असून इतरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आनंद साबणे यांनी सांगितले.
तर तीन जण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. भोर डेपोच्या बस खराब झाल्या असून जागोजागी बंद पडत असतात. बसमध्ये काही तरी बिघाड झाल्यामुळेच अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अजित प्रकाश आवाडे असे बस वाहकाचे नाव असून सोपान काशिनाथ तायाडे बस चालवत होते.
बस अपघातातील जखमींची नावे –
सविता रघूनाथ पिलाणे, शिवराम देवबा पिलाणे , शिवन्या दामगुडे ,द्रोपती किसन करंजकर ( अंकुश पिलाणे पुजा नवनाथ बांदल , रंजना विठ्ठल पिलाणे , मुक्ताबाई दामगुडे, पुष्पा दत्ताञय दामगुडे , अंकिता पिलाणे , छंबुबाई दामगुडे , सागर दामगुडे , हरिभाऊ दामगुडे , सुप्रिया शिंदे , बाजीराव शिंदे , निखिल पिलाणे , संगिता भगवान गोडांवळे , अंकुश दामगुडे , रमेश सिधू दामगुडे , भिकू खोपडे , द्रोपदा दामगुडे , यशदाबाई पिलाणे , गोपाळ गोविंद दामगुडे , सोपान दामगुडे , नामदेव दामगुडे , पार्वती भालघरे , अनिता दामगुडे , यशवंत सोनबा दामगुडे , रंजना कोडींबा मोरे , प्रतिक्षा अनिल दामगुडे ,आनुबाई हरिभाऊ दामगुडे, तुलशाबाई रामचंद्र पिलाणे , भागुबाई कृष्णा पवार , कमल गोपाल दामगुडे , वेंदात संजय शिंदे , सिंधूबाई चंद्रकांत दामगुडे , सरिता आनंदा दामगुडे , अनुबाई हरिभाऊ दामगुडे , भागुबाई कृष्णा पिलाणे , मोनिका पांडुरंग दामगुडे, अशी बसमधील जखमींची नावे आहेत.