#SSR_Drugs_Case : एनसीबी दाखल करणार आरोपपत्र; रिया चक्रवर्तीचेही नाव

मुंबई – देशभरात गाजत असलेल्या सुशांत सिंह राजपूतप्रकरणी संबंधित ड्रग्ज रॅकेटचे ३० हजार पानांचे आरोपपत्र एनसीबी आज न्यायालयात दाखल करणार आहे.  एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे स्वतः आरोपपत्र सादर करणार आहेत.  या आरोपपत्रात रिया चक्रवर्तीसह अन्य ३३ जणांना आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे

माहितीनुसार,  चार्जशीट १२ हजार पानांची असून, रियासह एकूण ३३ जणांवर यात आरोप केले गेले आहेत. तर २०० साक्षीदार आहेत.

सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून २०२० रोजी संशयास्पद आढळून आला होता. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले होते. यानंतर मोठे वादविवाद झाले. सुशांतने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला होता. याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आले होते. ती एक महिना तुरूंगातही होती.

तसेच, या प्रकरणी एनसीबीने अनेक ठिकाणी धाडी टाकत ड्रग्ज जप्त केले होते. व काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती. त्यांचीही नावे आरोपपात्रात समाविष्ट आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.