मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि हरहुन्नरी अभिनेता ‘सुशांत सिंग राजपूत’ने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील (14 जून 2020) आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते.
Narcotics Bureau Control arrests Siddharth Pathani from Hyderabad in the drugs case linked to Bollywood actor Sushant Singh Rajput’s death: NCB
— ANI (@ANI) May 28, 2021
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात NCB ने सर्वात मोठी कारवाई केली आहे. NCB ने सुशांत सिंग राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणीला अटक केली आहे.
सिद्धार्थला हैदराबादेतून अटक करण्यात आली. धक्कादायक म्हणजे सुशांतसिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात हात असल्याचा आरोप सिद्धार्थ पिठाणीवर आहे. सिद्धार्थला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
सुशांत सिंग राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचला होता. तर त्याने हिंदी सिनेसृष्टीत काय पो छे, पीके, शुद्ध देसी रोमान्स, छिछोरे अशा सिनेमांधूनही काम केलं होतं. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण हिंदी सिनेसृष्टी हादरली.