SSR Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणाले…

सुशांतच्या मित्र मैत्रिणी आणि प्रिजनांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे  सोपवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने त्याचे पालन आणि मदत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसल्याचे मानण्यात येत आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर त्याच्या चाहत्यांसोबतच मित्र मैत्रिणी आणि प्रिजनांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुशांतची प्रेयसी म्हणजेच एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनं लगेचच आपलं मत मांडलं. नेहमी सत्याचाच विजय होतो, या आशयाचं ट्विट करत अंकितानं न्यायदेवतेचा फोटो पोस्ट केला आहे.

तसेच, अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली “माणूसकी जिंकली… सर्व एसएसआर योद्ध्यांचे हार्दिक अभिनंदन! आपल्या एकीच्या बळाचा विजय झाला.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आनंद व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.