पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा दहावीचा निकाल 93.83 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षा पेक्षा यंदाच्या निकालात 3.11 टक्क्यांनी घट झाली आहे. मुलांपेक्षा मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.11 टक्के तर सर्वात कमी नागपूर विभागाचा 92.05 टक्के एवढा आहे.दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातील 15 लाख 41 हजार 666 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यात 8 लाख 21 हजार 524 मुले तर 7 लाख 20 हजार 142 मुलींचा समावेश होता. राज्य मंडळ अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यावेळी सचिव अनुराधा ओक उपस्थित होते.
विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल –
पुणे – 95.64
नागपूर- 92.05
औरंगाबाद- 93.23
मुंबई-93.66
कोल्हापूर- 96.73
अमरावती- 93.22
नाशिक-92.22
लातूर-92.67
कोकण – 98.11
निकाल
मुले – 92.05 टक्के
मुली – 95.87 टक्के
या साईटवरती पाहता येणार निकाल
mahresult.nic.in
https://ssc.mahresults.org.in
http://sscresult.mkcl.org