कामशेत केंद्राचा दहावीचा निकाल 78.43 टक्‍के

साक्षी तुकाराम ढवळे 92.20 टक्‍के गुणांसह अव्वल

कामशेत : कामशेत केंद्राच्या अंतर्गत सात शाळा होत्या. या सात शाळांतून एकूण 640 विद्यार्थ्यानी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील 502 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कामशेत येथील पंडित नेहरू शाळेचा निकाल 80.00 टक्‍के लागला.

कामशेत :

कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालायातून दहावीच्या परीक्षेसाठी 287 विद्यार्थी बसले होते. त्यातील 232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शाळेतून साक्षी तुकाराम ढवळे (92.20 टक्‍के) प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक कोमल अनिल बिनगुडे (89.20 टक्‍के), तृतीय क्रमांक निकिता पोपट येवले (86.30 टक्‍के).

महर्षी कर्वे आश्रमशाळा : निकाल 97.36

येथील महर्षी कर्वे मुलींच्या आदिवासी आश्रम शाळेतून 38 मुलीं दहावीची परीक्षा दिली. त्यातील 37 मुली उत्तीर्ण झाली आहेत.

जैन इंग्लिश स्कूलमध्ये मुलींची बाजी

कामशेत येथील जैन इंग्लिश स्कूलचा निकाल 97.56 टक्‍के लागला आहे. या शाळेमधून दहावीच्या परीक्षेस एकूण 41 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेमध्ये रोशनी संजय गादिया (83.20) हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय ख़ुशी पाडावकर (82.80 टक्‍के), तर तृतीय क्रमांक सामय परमार (82.60 टक्‍के),

सुमन रमेश तुलसियानी स्कूलचा निकाल 95 टक्‍के

कामशेत येथील सुमन रमेश तुलसियानी स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी 38 विद्यार्थी बसले होते. त्यातील 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या स्कूलमध्ये सागर किरण चौगुले (84.80 टक्‍के) प्रथम आला आहे. द्वितीय क्रमांक रोहन विष्णू लगड (81.20 टक्‍के) आणि तृतीय क्रमांक अपेक्षा चंपालाल गादिया (78.60 टक्‍के).

माध्यमिक विद्यालयाचा निकाल 82.14

संगिसे येथील कै. उषाताई लोखंडे ट्रस्ट संचलित माध्यमिक विद्यालयाचा निकाल 82.14 लागला असून, या शाळेतून 28 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील 23 उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून प्रथम क्रमांक दिव्या हनुमंत शिरसट (79.20 टक्‍के) द्वितीय क्रमांक प्राजक्‍त अनिल ढमाले (75.60 टक्‍के), तृतीय क्रमांक पायल भाऊ शिरसट (71.60 टक्‍के).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.