सोलापूर – पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत एस आर पी एफ जवानाने गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. जवानाने हा गोळीबार रागाच्या भरात केला असून यामध्ये मेहुण्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. तर मेहुणा जखमी झाला आहे. या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला आहे.तर एकजण जखमी झाला आहे. जखमीला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गोरोबा महात्मे असे गोळीबार करणाऱ्या एस आर पी एफ जवानाचे नाव असून नितीन भोसकर गोळीबारात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बालाजी महात्मे जखमी व्यक्तीचे नाव आहे. वैराग पोलिसांनी जवानास अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून एक सरकारी पिस्तूलसह 26 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत.
पत्नीवर असणाऱ्या चारित्र्याच्या संशयावरून बोलण्यासाठी जवानाचे सासरचे मंडळी काल भातांबारे गावी आले होते. मात्र, बोलणं फिसकटल्यामुळे जवानाने रागाच्या भरात सरकारी पिस्तूलचे 4 राउंड फायर केले. यामध्ये जवानाच्या मेहुण्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे.