बंगळुरू : कंबाला शर्यतीत वेगाचा विक्रम साकार केलेल्या श्रीनिवास गौडा याने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिलेला प्रस्ताव नाकारला आहे. ‘आहे त्या स्थितीत मी खूप समाधानी असून मला काहीही सिध्द करायचे नाही’, असे गौडाने सांगितले आहे.
म्हशींच्या शर्यतीत (कंबाला) १३.६२ सेकंदात १४२.५ मीटरचे अंतर पार करणा-या गौडाला क्रीडा मंत्रालयाने साई क्रीडा प्रशिक्षण शिबिरात चाचणीसाठी बोलावले होते. मात्र, क्रीडा मंत्रालयाचा हा प्रस्ताव गौडाने आदरपूर्वक नाकारला.
कर्नाटकात दरवर्षी पारंपरिक महशींची शर्यत (कंबाला) आयोजित करण्यात येते. याच शर्यतीत गौडाने वेगात धावून ही शर्यत जिंकली. गौडाने केवळ ९.५५ सेंकदात १०० मीटरचे अंतर पार केले होते.
गौराने आॅलिम्पिकपटू उसेन बोल्टशी बरोबरी केली होती. गौडाच्या कामगिरीची दखल घेत केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी साईच्या अकादमीत गौडाची चाचणी घेण्याची तसेच त्याला यशस्वी ठरल्यास स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.