श्रीनगरच्या खराब वातावरणाचा राष्ट्रपतींच्या द्रास दौऱ्यावर परिणाम

नवी दिल्ली : आज कारगिल विजयाची 20 वर्ष पुर्ण झाली असून देशभरात या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील द्रासमध्ये शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणार आहेत. परंतु, सध्या श्रीनगरमध्ये वातावरण खराब असल्यामुळे राष्ट्रपती आपल्या नियोजित वेळेत पोहचणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्‍मिरच्या द्रासमध्ये कारगिल विजय दिवसानिमीत्त शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. श्रीनगरच्या खराब वातावरणामुळे इथली हेलिकॉप्टरची सेवा थांबवण्यात आली आहे त्यामुळे द्रासमध्ये येण्यास राष्ट्रपतींना त्यांच्या नियोजित वेळेच्या थोड्या उशिराने कार्यक्रमस्थळी पोहचावे लागत आहे. नियोजनानुसार राष्ट्रपती हे सकाळी 9.30 वाजता द्रासमध्ये पोहचणार होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.