श्रीलंकेचा जायबंदी कर्णधार गोलंदाजी करू शकणार नाही 

डम्बुला : श्रीलंका क्रिकट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथुज याने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिके अगोदर स्वतःला जायबंदी करून घेतले असल्याने  रविवारपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत तो गोलंदाजी करू शकणार नाही.
मॅथुज हा मागील काही महिन्यांपासून आपल्या तंदुरुस्तीच्या समस्यांना तोंड देत असून तंदुरुस्ती मिळवण्यासाठी झगडात आहे. ३१ वर्षीय या कर्णधाराला वाटते की श्रीलंकेचा संघ २०१७ मधील खराब प्रदर्शनाच्या दबावाच्या बाहेर आला आहे. त्यांनी कसोटी सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवत २ कसोटी सामन्याची मालिका २-० ने जिंकली आहे.
“आम्ही कसोटी सामन्यात चांगला खेळ केला होता आणि अशा आहे की त्याच प्रकारचे प्रदर्शन आम्ही एकदिवसीय सामन्यात देखील करू.” १९६ एकदिवसीय सामन्यात ११४ बळी मिळवणारा मॅथुज पुढे म्हणाला, ” मी या मालिकेत गोलंदाजी करू शकणार आंही. मी जाळ्यांमध्ये गोलंदाजी करून पाहणार आहे आणि त्यानंतर कळेल की मला कसे वाटते. “
सलामीवीर धनुष्का गुनथैलाका यांच्यावरील ६ सामन्याचा बंदीविषयी आणि वादा विषयी विचारले असता तो म्हणाला, हे खूप निराशाजनक आहे पण संघातील शिस्तीला आपले प्राधान्य आहे.
२७ वर्षीय गुनथैलाका याच्यावर खेळाडूंच्या नियमांचे उल्लंघन आणि नॉर्वियन महिलेच्या त्याच्या खोलीत बलात्कार प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. गुनथैलाका याच्यावर बलात्काराचे आरोप नाहीत पण त्याचा मित्रावर आरोप आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)