#SLvZIM : झिम्बाब्वेकडे पहिल्या डावात ११३ धावांची आघाडी

हरारे : झिम्बाब्वेने मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला पहिल्या डावात २९३ वर गुंडाळत ११३ धावांची आघाडी घेतली आहे.

त्यानंतर दुस-या डावात फलंदाजी करताना झिम्बाब्वेने तिस-या दिवसअखेर १ बाद ६२ धावा केल्या असून श्रीलंकेवर एकूण १७५ धावांची आघाडी घेतली आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रेगिस चकाब्वा १४ आणि प्रिंस मसवउरे २६ धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे : पहिला डाव – सर्वबाद ४०६ आणि दुसरा डाव – २०.५ षटकांत १ बाद ६२(क्रेग एर्विन १३, प्रिन्स मसवउरे खेळत आहे २६, रेगिस चकाब्वा खेळत आहे १४, विश्वा फर्नान्डो १-९) विरूध्द श्रीलंका : पहिला डाव – सर्वबाद २९३( अँजेलो मॅथ्यूज ६४, ओशदा फर्नांडो ४४, करूणारत्ने ४४, सिंकदर रझा ७-११३)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.