हॉंगकॉंग: भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने दर्जाला साजेसा खेळ करत हॉंगकॉंग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेस केला.
त्याने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आपलाच सहकारी सौरभ वर्मा याचा 21-11, 15-21, 21-19 असा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. गेल्या सात स्पर्धांमधील श्रीकांतची ही सरस कामगिरी ठरली आहे.
श्रीकांतला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याची लढत चीनच्या चेन लॉंगशी होणार आहे. दरम्यान, भारताच्या एच. एस. प्रणयला इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीकडून 21-12, 21-19 असा पराभव पत्करावा लागला.