Maharashtra Assembly Election 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीती जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी भाजप 140 ते 150 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 80 तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी 55 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीतील छोट्या मित्रपक्षांसाठी तीन जागांचा कोटा ठेवण्यात आला आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र, नेते श्रीकांत शिंदे यांनी जागावाटपाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’ श्रीकांत शिंदे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जागावाटपाबाबत भाष्य केलं. “कार्यकर्त्यांची इच्छा असते, प्रत्येक विधानसभा त्या-त्या पक्षाला सुटली पाहिजे. कार्यकर्त्यांची इच्छा आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. परभणी, पाथरी, गंगाखेड याबबतची चांगली बातमी लवकरच दिली जाईल. मात्र युतीमध्ये लढत असताना सहकाऱ्यांचाही विचार करावा लागतो”, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या जागेची उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीत धुसफूस बघायला मिळाली होती. आता श्रीकांत शिंदे यांनी परभणी, पाथरी, गंगाखेड या मतदारसंघांबाबत भाष्य केल्याने महायुतीचे इतर नेते काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महाविकास आघाडीकडून तगडी स्पर्धा
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी स्पर्धा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्रदीपक कामगिरीने महायुतीला वेक-अप कॉल दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत या उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती करण्यावर महाविकास आघाडीचे डोळे असणार आहेत.