गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी श्रीगोंद्यात गुन्हा दाखल

मतदान करताना काढलेली क्‍लीप आली अंगलट
श्रीगोंदा  (शहर प्रतिनिधी) – पोस्टल मतदान करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करून गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी युनियन बॅंकेच्या पंढरपूर शाखेतील अधिकारी संतोष छबुराव खंडागळे (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ व निवडणूक निरीक्षण अधिकारी हे श्रीगोंदा तहसील कार्यालयात सायंकाळी सात वाजता उपस्थित होते. यावेळी भाजप प्रतिनिधी तुकाराम दरेकर हे कार्यालयात आले. त्यांनी श्रीगोंदा येथील पोस्टल मतपत्रिका क्रमांक 1293 वर कोणीतरी इसमाने मतदान करुन मतदान प्रक्रियेचा गोपनियतेचा भंग केला आहे, असे सांगितले.

ही मतपत्रिका कोणाला दिली आहे, याबाबत शोध घेतला असता, सदरची मतपत्रिका संतोष छबुराव खंडागळे यास दिल्याचे आढळून आले. ते सध्या पंढरपूर येथील युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा लक्ष्मी रोड येथे कार्यरत आहे. ते सध्या मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यात निवडणूक कामी असल्याचे समजले आहे. संबंधित इसमाने मतपत्रिकेवर मतदान करुन बंद लिफाफ्यात पाठविण्यापूर्वी अनाधिकाराने मतदान केल्याचे व्हिडिओ क्‍लीप काढून ती उघड करण्यासाठी सोशल मीडियावर सार्वजनिक करुन व्हायरल केली आहे.

गोपनियतेचा भंग केला. तसेच 9545451212 या मोबाईल क्रमांकावर पाठविली असता, त्याने ती त्याचे व्हॉट्‌स ऍपवर स्टेटस ठेवून सार्वजनिक केली. त्यामुळे मतपत्रिकेबाबत गोपनियतेचा भंग झाला. याप्रकरणी निवडणूक भरारी पथकातील विकास पवार यांच्या फिर्यादावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)