कोलंबो – श्रीलंकेतील ज्येष्ठ व अनुभवी राजकारणी दिनेश गुणवर्दे यांनी शुक्रवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. श्रीलंकेच्या राजकारणातील दिग्गज मानले जाणारे गुणवर्दे यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री आणि शिक्षणमंत्री म्हणून काम केले आहे. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी एप्रिलमध्ये त्यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.
73 वर्षीय विक्रमसिंघे यांनी गुरुवारी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्याने पंतप्रधानपद रिक्त झाले होते. ते सहमतीने निवडण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला देशाची ढासळलेली अर्थिक स्थिती सावरण्याचे मोठे आव्हान आहे. आता नवीन राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान निवडण्यात आल्याने श्रीलंकेतील राजकीय स्थितीत स्थिरता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.