श्रीलंकेतले आत्मघातकी हल्ल्यांचे ट्रेनिंग सेंटर सापडले

कोलोंबो – श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी जेथे प्रशिक्षण घेतले, ते ट्रेनिंग सेंटर तपास अधिकाऱ्यांनी शोधून काढले आहे. याच ट्रेनिंग सेंटरमध्ये दहशतवाद्यांनी चर्च आणि हॉटेलमधील आत्मघातकी बॉम्बस्फोटांसाठीचे प्रशिक्षण घेतले होते.

नौवारा एलियामधील ब्लॅकपूल भागामध्ये दोन मजली इमारतीमध्ये हे ट्रेनिंग सेंटर आहे. या साखळी बॉम्बस्फोटांमागील प्रमुख संशयित संघटना नॅशनल थवाहीद जमाथच्या काही हस्तकांना सैन्थामारुथू, कालमुनाइ येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान या ट्रेनिंग सेंटरबाबतची माहिती उघड झाली होती. प्रत्यक्ष आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या 9 जणांसह “एनजेटी’च्या 38 सदस्यांनी या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले होते. मुख्य हल्लेखोर झहरान याच्यासह या सदस्यांचे अंतिम ट्रेनिंग प्रत्यक्ष बॉम्बस्फोटांच्या चार दिवस आगोदर, 17 एप्रिल रोजी झाले होते, असे प्राथमिक तपासामध्ये समजले आहे.

या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार झरहान यानेच शांग्री ला हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवला होता. त्याच्याबरोबर इल्हाम अहमद इब्राहिम हा अन्य एक साथीदारही होता. शांग्री ला हॉटेलमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट केल्यावर तो ठार झाला होता.

हे ट्रेनिंग सेंटर करण्यासाठी अख्खी इमारतच भाड्याने घेण्यत आली होती. पोलिसांनी या इमारतीच्या मालकाला आणि अन्य दोघांना अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.