IND vs SL 1st T20 (Playing XI Update) – भारताचा श्रीलंका दौरा आजपासून सुरू होत आहे. यासोबतच एका गंभीर युगाचीही सुरुवात होत आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. नवा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चांगली सुरुवात करायची आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकेले येथे खेळवला जात आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा श्रीलंका संघांच्या बाजूनं लागला आहे. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने या सामन्यात न खेळणाऱ्या चार खेळाडूंची नावे घेतली. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि खलील अहमद यांचा समावेश आहे.
Charith Asalanka won the toss and elected to the field first! #SLvIND pic.twitter.com/FZo0cCU8G6
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 27, 2024
दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे….
भारत : शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, रियान पराग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महिश तिक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
तीन सामन्यांची टी-20 मालिका संपूर्णपणे पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाईल. येथे खेळल्या गेलेल्या 23 टी-20 सामन्यांपैकी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 12 सामने जिंकले आहेत. पल्लेकेलेमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 168 आहे.
भारत आणि श्रीलंका या दोघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. पुढील टी-20 विश्वचषक 2026 मध्ये खेळवला जाईल. अशा परिस्थितीत, दोन्ही संघांना त्यांच्या नवीन खेळाडूंची आणि बेंच स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे.