#CWC19 : नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा फलंदाजीचा निर्णय

लीड्‌स : विश्‍वचषकातीलाअपल्या पाच सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवू शकलेल्या श्रीलंकेसमोर विश्‍वचषकातील सर्वात समतोल संघ समजल्या जाणाऱ्या बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असुन आजच्या सामन्यात पराभूत झाल्यास श्रीलंकेचे विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

श्रीलंका-इंग्लंड यांच्यातील सामन्यास हेडिंग्ले, लीड्स येथे सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या संघाच्या बाजूने लागला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंका संघ –

दिमुथ करुणारतने, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, धनंजया डी सिल्वा, जीवन मेन्डिस, थिसारा परेरा, इसुरू उदाना, लसिथ मलिंगा, नुवान प्रदीप

इंग्लंड संघ –

जेम्स विन्स, जॉनी बेयर्सटो, जो रूट, इयोन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, क्रिस वोक्स, जोफ़्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड

Leave A Reply

Your email address will not be published.