#CWC19 : श्रीलंकेचे वेस्टइंडिजसमोर 339 धावांचे लक्ष्य

चेस्टर ली स्ट्रिट – अविष्का फर्नाडो, कुसल परेरा आणि लाहिरू थिरिमाने यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 338 धावांची मजल मारत वेस्टइंडिज संघासमोर विजयासाठी 339 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने गोलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंकेस प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते.

श्रीलंकेचे सलामीवीर दिमुथ करूणारतने आणि कुसल परेरा यांनी चांगली सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 93 धावांची भागिदारी केली. जेसन होल्डर याने दिमुख करूणारतने याला 32 धावांवर बाद करत ही भागिदारी फोडली. त्यानंतर काही वेळातच कुसल परेरा 64(51 चेंडू) धावांवर धावबाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अविष्का फर्नांडो योन श्रीलंकेच्या संघाची कमान हाती घेत कुसल मेंडिस 39, एंजेलो मैथ्यूज 26 आणि लाहिरू थिरिमाने याच्या नाबाद 45 धावांच्या साथीने संघाची धावसंख्या 300 पार नेली. संघाची धावसंख्या 314 वर असताना 47.2 व्या षटकांत अविष्का फर्नांडोला शेल्डन काॅटरेलने बाद केले. अविष्का फर्नांडोने 103 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 104 धावांची खेळी केली.

वेस्टइंडिज संघाकडून गोलंदाजीत जेसन होल्डरने 10 षटकांत 59 धावा देत 2 गडी बाद केले तर शेल्डन काॅटरेल, ओशन थाॅमस आणि फैबियन एलन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.