#NZvsSL : कसोटी मानांकनात अग्रस्थानाचे न्यूझीलंडचे ध्येय

चिवट झुंज देण्यासाठी श्रीलंका सज्ज

गॅले – विश्‍वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजयापासून वंचित राहिलेल्या न्यूझीलंडला त्या कटू आठवणी पुसण्याची संधी आजपासून येथे सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत मिळणार आहे. दोन सामन्यांची मालिका जिंकून क्रमवारीत अग्रस्थान घेण्याचा ते प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.

वेगवान गोलंदाजी हे न्यूझीलंडचे मुख्य अस्त्र असले तरी येथील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीस अनुकुल असल्यामुळे त्यांनी लेगस्पिनर टॉड ऍस्टलबरोबरच एजाज पटेल यालाही संघात स्थान दिले आहे. या दोन फिरकी गोलंदाजांना स्थान देताना संघात दोनच वेगवान गोलंदाज ठेवावे लागणार आहेत्‌. तसे झाल्यास अष्टपैलू खेळाडू कॉलीन डी ग्रॅंडहोम याला फलंदाजीबरोबर उपयुक्त बदली गोलंदाज म्हणूनही संधी दिली जाईल.

ट्रेंट बोल्टचे स्थान निश्‍चित असल्यामुळे टीम साऊदी व नील वॅगनर यांच्यापैकी एकाची अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळेल. फलंदाजीत कर्णधार केन विल्यमसन, रॉस टेलर, ग्रॅंडहोम, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची भिस्त आहे.

श्रीलंकेपुढे अनेक समस्या आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील पराभवानंतर त्यांचे मुख्य प्रशिक्षक चंडीका हाथरुसिंघे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पाच महिन्यांपूरवी लंकेने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ओशादा फर्नांडोने चमकदार कामगिरी केली होती. येथेही त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. माजी कर्णधार दिनेश चंडीमल व लाहिरू कुमारा यांच्या पुनरागमनामुळे त्यांची बाजू बळकट झाली आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), जीत रावळ, रॉस टेलर, कॉलीन डी ग्रॅंडहोम, टॉड ऍस्टल, विल्यम सोमरविले, मिचेल सॅंटेर, टॉम ब्लुंडेल, बी.जे. वॅटलिंग, ट्रेन्ट बोल्ट, टॉम लॅथम, हेन्‍री निकोल्स, टीम साऊदी, एजाज पटेल, नील वॅगनर.

श्रीलंका – दिमुथ तिलकरत्ने (कर्णधार), दिनेश चंडीमल, लाहिरू तिरीमाने, ओशादा फर्नांन्डो, अँजेलो मॅथ्युज, धनंजय डी सिल्वा, कुशल मेंडिस, कुशल परेरा, निरोशन दिकवाला. अकिला धनंजय. लसिथ एम्बुल्डेनिया, लक्षन संदाकन, सुरंगा लकमल, लाहिरू कुमारा, विश्‍वा फर्नांन्डो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here