कोलोंबो – वैद्यकीय प्रयोगांसाठी श्रीलंकेतील 1 लाख माकडांना चीनमध्ये निर्यात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला श्रीलंकेत मोठा विरोध व्हायला लागला आहे. सरकारच्या या निर्णयाच्याविरोधात श्रीलंकेतील वन्यप्रेमींनी आज मोठे आंदोलन केले. टोक मकाक जातीची माकडे श्रीलंकेतच सापडतात.
इंटरनॅसनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या यादीमध्ये या माकडांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र तरी श्रीलंकेत ही प्रजाती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली नाही.
ही माकडे चीनमधील प्राणिसंग्रहालयांमध्ये ठेवण्यात येणार असल्टयाचे सरकारने म्हटले आहे. मात्र त्यात तथ्य नसून या माकडांना प्रयोगशाळेतील प्रयोगांसाठी तेथे नेण्यात येणार असल्याचा पर्यावरणवाद्यांचा दावा आहे. ही माकडे शेतीचे नुकसान करत असल्यामुळे एक डोकेदुखी बनली असल्याचा श्रीलंकेच्या सरकारचा दावा आहे.