दहशतवादी हल्लाच्या १० वर्षानंतर श्रीलंकेचा संघ पाकमध्ये

इस्लामाबाद : दहा वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी २००९ मध्ये श्रीलंका संघावर केलेल्या हल्ल्यानंतर प्रथमच त्यांचा संघ कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानमध्ये पोहोचला आहे. ही मालिका दोन कसोटींची असून ११ डिसेंबरपासून पहिला आणि १९ डिसेंबरपासून दुसरी कसोटी सुरू होईल.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी श्रीलंका संघाचे पाकिस्तानात आगमन झाल्याचे ट्विट करत व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

तसेच श्रीलंका संघाचे पाकिस्तानमध्ये आगमन ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी वसीम खान यांनी दिली आहे.

दरम्यान, २००९ मध्ये लाहोरमध्ये गद्दाफी स्टेडियमच्या बाहेर श्रीलंका संघाच्या बसच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ८ नागरिक मृत्यूमुखी पडले होते तर ७ खेळाडू आणि अधिकारी जखमी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.