ब्रासिलिया: ब्राझीलमध्ये सध्या राजकीय अराजकतेचे वातावरण दिसत आहे. म्हणजेच मागील वर्षी श्रीलंकेमध्ये जी अराजकता माजली होती त्याचीच पुरावृत्ती ब्राझीलमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी राजधानी ब्रासिलियामध्ये चांगलाच गोंधळ घातला आहे. नवे राष्ट्रपती लुईझ इनासियो लूला डी सिल्वा यांनी पदाची शपथ घेण्याविरोधात बोल्सोनारो यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन हिसंक बनले असून आंदोलकांनी ब्राझीलच्या संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी देखील तत्काळ कारवाई करत सरकारी इमारतीमध्ये घुसलेल्या ४०० आंदोलकांना अटक केली आहे.
ऑक्टोबर महिन्यात ब्राझीलमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक पार परडली. या निवडणुकीत बोल्सोनारो यांना पराभवाचा सामना करावा लागला. लुईझ इनासियो लूला डी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला विजय मिळाला. लुईझ इनासियो लूला डी सिल्वा यांनी तिसऱ्यांदा ब्राझीलचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मात्र शपथविधी झाल्यानंतर बोल्सोनारो यांचे समर्थक निवडणुकीचा निकाल मान्य करायला तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे.
All eyes need to be on Brazil right now. Democracy is completely under attack. Bolsonaro supporters are invading Congress, the presidential
palace, and realms of power in Brazil.
Unbelievable scenes.— Dr. Jennifer Cassidy (@OxfordDiplomat) January 8, 2023
त्यातच हजारो समर्थक रस्त्यांवर उतरले असून सुरक्षा व्यवस्थेचे सर्व नियम तोडून संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात समर्थक घुसले आणि त्यांनी तोडफोड व इतर नकुसान केले. एवढेच नाही तर या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक यावेळी हिंसक झाले आणि संसद भवनाचे दरवाजे, खिडक्या मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. पोलिसांनी यावेळी ४०० च्या आसपास आंदोलकांना ताब्यात घेऊन या इमारतीमधील नुकसान थांबवले.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर टीका केली. ट्विट करत बायडेन म्हणाले की, ब्राझीलमधील लोकतांत्रिक संस्थांना आमचे पूर्ण समर्थन आहे. लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतरण होत असताना त्यावर झालेला हल्ला हा निषेधपूर्ण आहे. ब्राझीलमधील लोकांच्या इच्छेला असे आव्हान देता येणार नाही. आम्ही राष्ट्रपती लुईझ इनासियो लूला डी सिल्वा यांच्यासोबत काम सुरु ठेवू.असे म्हटले आहे.
All eyes need to be on Brazil right now. Democracy is completely under attack. Bolsonaro supporters are invading Congress, the presidential
palace, and realms of power in Brazil.
Unbelievable scenes.— Dr. Jennifer Cassidy (@OxfordDiplomat) January 8, 2023
तर दुसरीकडे बोल्सोनारो यांच्यावर हिंसा भडकवण्याचा आरोप होत असताना त्यांनी ट्विट करत आपली बाजू मांडली आहे. “माझ्यावर केलेले आरोप माल मान्य नाहीत. वर्तमान राष्ट्रपतींनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. “