कोलंबो – आर्थिक दिवाळखोरीतून जात असलेल्या श्रीलंकेने मंगळवारी पेट्रोलच्या दरात 24.3 टक्के आणि डिझेलच्या किमतीत 38.4 टक्क्यांनी वाढ केली. यानंतर श्रीलंकेत एक लिटर पेट्रोलची किंमत 420 श्रीलंकन रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 400 श्रीलंकन रुपयांवर पोहोचली आहे.
इंधन दरवाढीबाबत, श्रीलंकेच्या सरकारी तेल कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले की, ऑक्टेन 92 पेट्रोल (जे श्रीलंकेतील बहुतांश वाहनांमध्ये वापरले जाते) 82 रुपये अर्थात 24.3 टक्के आणि डिझेलच्या किमतीत 111 रुपये म्हणजेच 38.4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.