– न्यूझीलंड पहिला डाव 4 बाद 580 घोषित
– श्रीलंका पहिला डाव सर्वबाद 164
– फॉलोऑननंतर श्रीलंका दुसऱ्या डावात 2 बाद 113
वेलिंग्टन – न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा संघ डावाच्या पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. यजमान न्यूझीलंडने पहिला डाव 580 धावांवर घोषित केल्यावर श्रीलंकेचा पहिला डाव 164 धावांवर संपूष्टात आणला. फॉलोऑनच्या नामुष्कीनंतरही श्रीलंकेची दुसऱ्या पडझड झाली असून तिसऱ्या दिवसअखेर त्यांची 2 बाद 113 अशी स्थिती बनली आहे. डग ब्रेसवेलने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या फलंदाजीची वाताहत केली आहे. ते अद्याप 303 धावांनी पिछाडीवर आहेत.
न्यूझीलंडने केन विल्यमसन व हेनरी निकोलस यांच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर आपला पहिला डाव 580 धावांवर घोषित केला. श्रीलंकेने चांगल्या सुरुवातीनंतरही ब्रेसवेलच्या गोलंदाजीसमोर आपल्या विकेट गमावल्या. ब्रेसवेलसह मॅट हेनरीनेही 3 गडी बाद केले.
श्रीलंकेचा पहिला डाव 164 धावांत संपूष्टात आला. त्यांच्या दीमुथ करुणारत्नेने 89 धावांची खेळी केली. दीनेश चंडीमल 37 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडने त्यांना फॉलोऑन दिला.
At Stumps on Day 3, Sri Lanka trail by 303 runs. #NZvSL pic.twitter.com/UCJZgYx5du
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) March 19, 2023
आपला दुसरा डाव सुरू केल्यावर करुणारत्नेने या डावातही अर्धशतकी खेळी केली. तो 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर कुशल मेंडीस अर्धशतकी खेळी करुन खेळपट्टीवर ठामपणे उभा आहे. त्याला साथ देत अँजेलो मॅथ्युज 1 धावेवर खेळत आहे. खेळ थांबला तेव्हा त्यांच्या 2 बाद 113 धावा झाल्या आहेत.
#INDvAUS 2nd ODI : स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर Team India चे शेर झाले ढेर, अवघ्या…
संक्षिप्त धावफलक –
न्यूझीलंड पहिला डाव – 123 षटकांत 4 बाद 580 धावा घोषित. श्रीलंका पहिला डाव – 66.5 षटकांत सर्वबाद 164 धावा. (दीमुथ करुणारत्ने 89, दीनेश चंडीमल 37, मॅट हेनरी 3-44, डग ब्रेसवेल 3-50). श्रीलंका दुसरा डाव – 43 षटकांत 2 बाद 113 धावा. (दीमुथ करुणारत्ने 51, कुशल मेंडीस खेळत आहे 50, अँजेलो मॅथ्युज खेळत आहे 1, टीम साउदी 1-9, डग ब्रेसवेल 1-20).