कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये आज साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली आहे. आज जगभरामध्ये ईस्टर संडे साजरा केला जात असून श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये देखील ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे आहे.
बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये आतापर्यंत २०७ हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावलेे असल्याची माहिती मिळाली असून, ४५० हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसल्याने या बॉम्बस्फोटांमागे नक्की कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. मात्र ७ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Reuters quoting police: Death toll from Sri Lanka's eight explosions rises to 207; 450 injured, seven people arrested pic.twitter.com/9FLwr4giAS
— ANI (@ANI) April 21, 2019