कोलंबो – श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाये राजपक्षे यांनी देशातील अत्यावश्यक क्षेत्रातील कामगारांच्या संपावर बंदी घातली आहे. अमेरिकेतील कंपनीबरोबर करण्यात आलेल्या उर्जा विषयक कराराला विरोध करण्यासाठी देशातील कामगार कंपन्यांनी संपाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजपक्षे यांनी हे विशेष आदेश जारी केले आहेत.
इंधन, द्रवरुप इंधन, रेल्वेद्वारे करण्यात येणारी मालवाहतुक, श्रीलंका परिवहन मंडळाकून करण्यात येणारी प्रवासी वाहतूक तसेच पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरण आणि पुरवठ्याशी संबंधित सर्व संवांना हा आदेश लागू असणार आहे.
याशिवाय सरकारी प्रशासन, विमा सेवा, अन्न पदार्थांशी संबंधित सेवा आणि टपाल सेवांनाही अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या न्यू फोट्रेस एनर्जी या कंपनीने राजधानी कोलोंबो जवळच्या यागादान्वी उर्जा प्रकल्पात उर्जाविषयक करार केल्याचा निषेध म्हणून देशभरातील कामगार संघटनांनी निषेध केला आहे आणि संप करण्याचा इशाराही दिला आहे.
सत्तारुढ आघाडीमधील काही छोट्या पक्षांनीही या कराराबाबत मतभेद व्यक्त केले आहेत. या कराराच्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ आघाजीतील पक्षांनी अध्यक्ष राजपक्षे यांच्याबरोबर चर्चेची मागणीही केली आहे.